#

Advertisement

Sunday, January 29, 2023, January 29, 2023 WIB
Last Updated 2023-01-30T10:58:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

देशातील स्वातंत्र्यलढ्यातील सोलापुरातील हुतात्म्यांच्या इतिहासाला उजाळा देणे गरजेचे : ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे

Advertisement

सोलापूर :  ब्रिटिश सरकारकडून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यामध्ये सोलापुरातील मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन हे चार हुतात्मे होऊन गेले, आज या घटनेला ९२ वर्ष पूर्ण झाली. परंतु, त्यांच्या या कार्याचा विसर शासनाला पडका आहे, या हुतात्म्यांच्या स्मृतिदीनानिमित्त अभिवादन कार्यक्रम होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे, सोलापूरचा हा इतिहास घराघरात पोहचायला हवा, अशी अपेक्षा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी व्यक्त केली.

सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशी देण्याच्या घटनेला 12 जानेवारी 2023 ला 92 वर्षं पूर्ण झाली. तर आज, 9 मे 2023 मध्येच सोलापूरच्या चार दिवसाच्या स्वातंत्र्याला 92 वर्षं पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर ॲड. कोमल साळुंखे - ढोबळे यांनी सोलापुरातील स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले, यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही घटना ठळकपणे सर्वांना ज्ञात आहेत, तर काही घटनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा, याविषयी सर्वांना माहिती करून देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अधिकृतपने अभिवादन उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.

सोलापूरने देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्याआधीच 17 वर्ष अगोदर चार दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे एकूण चार दिवस सोलापूर स्वतंत्र होते, त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली, पण केवळ सोलापूर शहरात 'मार्शल लॉ' लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं. ब्रिटिश सरकारच्या 150 वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे. अखेर, या संपूर्ण घटनाक्रमा दरम्यान 12 जानेवारी 1931 रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशीही शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु, हा इतिहास काळाच्या पानाआड लपला आहे, त्याला उजाळा देण्याचे काम आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे, असेही ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी नमूद केले.

यावेळी बहुजन रयत परिषदेचे ॲड. शुभा पिल्ले, विशाल खंदारे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वसती गृह कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.