Advertisement
सोलापूर : केंद्र सरकारनं कामगारांच्या संदर्भात आणि टेक्सटाईल विभागाच्या अंतर्गत धोरणाविषयी बारकाईनं विचार करावा. टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे सोलापूरचा आत्मा आहे. वर अनेक जणांचे रोजगार अवलंबून आहेत. सरकारच्या मदतीनंच सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला बळ मिळेल आणि रोजगाराची संधी वाढेल, केंद्रीय अर्थसंकल्पाकडून टेक्सटाईल इंडस्ट्रीला अपेक्षा आहेत असं मत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केल आहे.
सोलापुरात टेक्स्टाईल व्यवसाय करणे हे प्रतिष्ठेचे मानले जात असे. काळानुसार या कापड गिरण्या बंद झाल्या, अनेक जण बेरोजगार झाले. सोलापूर पुन्हा एकदा टेक्स्टाईल हब व्हावं यासाठी तेथील उद्योगांच्या आगामी बजेटपासून अपेक्षा आहेत असेही ढोबळे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी मांडलेले काही मुद्दे असे की...
1. उद्योगांचा विचार करून वीज बिलाच्या संदर्भात योग्य तरतुदी कराव्यात.
2. थकित बिलावर काही सूट जाहीर करावी किंवा त्या संदर्भात विशेष असे आर्थिक धोरण आखावे.2, 3. जीएसटीच्या संदर्भात ऑडिट लिमिट वाढवून व्यापाऱ्यांना दिलासा द्या.
4. इन्कम टॅक्सच्या संदर्भातली स्लॅबमध्ये काही ठोस असे निर्णय घ्यावे.
5\ इन्कम टॅक्स आणि एक्सपेंडिचर टॅक्स यांच्यामधील असणारी तफावत तपासून योग्य कर आकारवे..
6. टेक्स्टाईलच्या संदर्भात कॅपिटल इन्वेस्टमेंट वाढवून प्रत्येक योजना अधिक सोपी करावी.
7. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली तर टेक्स्टाईल विभागाला आणखी बळकटी मिळेल.
