#

Advertisement

Friday, January 27, 2023, January 27, 2023 WIB
Last Updated 2023-01-27T12:26:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अहमदनगर काँग्रेसची कार्यकारणी तडकाफडकी बरखास्त

Advertisement

अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता ढवळून निघत आहे. त्यामुळे काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त केली आहे.
जिल्हाध्यक्षने स्वतःहून राजीनामा दिलेला नाही, तर आम्ही त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे. कारण त्यांनी बंडखोर सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
सत्यजीत तांबेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यातच आता अहमदनगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुंखे यांनी तांबे यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकारणीच बरखास्त केली. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा विचार केल्यास एकप्रकारे बाळासाहेब थोरात यांनाच हा धक्का मानला जात आहे.