#

Advertisement

Thursday, January 19, 2023, January 19, 2023 WIB
Last Updated 2023-01-19T12:19:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला...

Advertisement

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तृळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत  आहे. संजय कदम यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. दापोली-विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम यांना धक्का देण्याची रणनीती सध्या ठाकरे गटाकडून आखण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.  पुढील 15 दिवसांमध्ये संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असून, यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झाल्यानं जिल्ह्यात ठाकरे गट पिछाडीवर गेला आहे. मात्र संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास पुन्हा एकदा या मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे.