#

Advertisement

Wednesday, January 18, 2023, January 18, 2023 WIB
Last Updated 2023-01-18T13:07:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"एकल" शब्द वापरावा त्यांना विधवा म्हणू नका !

Advertisement

बारामती : हळदी कुंकू हे सौभाग्यवतींचे लेणं मानलं जात. यामुळेच पतीच निधन झालेल्या अर्थात विधवा महिलांना हळदी कुंकू लावले जात नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रथा मोत नवा आदर्श निर्माण केला आहे. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये हळदी कुंकू साजरा केला आहे. विधवा महिलांना एकल शब्द वापरा असही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 
विधवा महिला खूप अडचणीचे जगत असतात.  त्यांना एकल शब्द वापरावा पण विधवा म्हणू नका. इंदापूरातील कौठळीत एका कार्यक्रमात त्यांनी विधवा महिलांना हळदी कुंकू लावत एकल शब्द वापरण्याचे आवाहन केले.  हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. विधवा महिला मात्र, कधी कुंकू लावत नाहीत. यामुळेच मी ज्या ठिकाणी जाते तेथील कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना कुंकू लावायला सांगते अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.