#

Advertisement

Tuesday, February 7, 2023, February 07, 2023 WIB
Last Updated 2023-02-07T11:20:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

चिंचवडचा उमेदवार 10 हजारांची चिल्लर घेऊन आला...

Advertisement

चिंचवड : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दोन्ही निवडणुकांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे, कारण सगळ्याच पक्षांच्या बंडखोरांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. चिंचवडमध्ये तर एका उमेदवार अर्ज दाखल करताना 10 हजार रुपयांची चिल्लर घेऊन आला.
रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला. "गल्लीत गोंधळ दिल्लत मजुरा" या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्येही अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं, त्याचीच पुनरावृत्ती चिंचवडमध्ये झाली आहे.  
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा पेठची पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यामध्ये हेमंत रासने उमेदवार आहेत. तर महाविकासआघाडीमध्ये कसब्याची जागा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीचे नाना काटे लढवत आहेत.