#

Advertisement

Tuesday, February 7, 2023, February 07, 2023 WIB
Last Updated 2023-02-07T11:32:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बाळासाहेब थोरातांनी गटनेतेपदाचा दिला राजीनामा?

Advertisement


मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता बाळासाहेब थोरात यांच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. प्रभारी एच के पाटील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात राजीनामा दिल्याचा उल्लेख केला आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच दिला आहे. 

थोरात माझ्या संपर्कात नाहीत : नाना पटोले 
बाळासाहेब थोरात गेल्या काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात नाही, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.