#

Advertisement

Monday, February 6, 2023, February 06, 2023 WIB
Last Updated 2023-02-06T13:01:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बारामतीचं नामांतर करा : विजय शिवतारे

Advertisement

बारामती : बारामती मतदारसंघाचं नाव बदलावं अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. बारामती मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामती शहराचा विकास होतो का? असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. पुरंदर, दौंड या विधानसभा मतदारसंघांचं काय? असंही शिवतारे यांनी विचारलं आहे.
बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बारामती मतदारसंघांचं नाव बदलून पुणे दक्षिण करा, अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे. 
बारामती लोकसभा मतदारसंघांचं नाव बदलून पुणे दक्षिण करावं, कारण बारामतीच्या नावाखाली आपण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जा. बारामतीचा विकास म्हणजे फक्त बारामती विधानसभेचा विकास आहे का? तुम्ही पुरंदरला, दौंडला, भोरला काय विकास केला आहे? तुम्हाला जे पाहिजे ते केंद्र सरकार, राज्य सरकार सगळे प्रकल्प बारामतीमध्ये हवे आहेत,' अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.