Advertisement
नागपूर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांकडून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 21 नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेत नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसमधील अनेक नेते हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्या कामावर नाराज असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 21 नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेतली आहे. या नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह 21 जणांचा समावेश आहे. नाना पटोले यांना हटवून आदिवासी नेते शिवाजी मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी या नेत्यांनी रमेश चिन्निथाला यांंच्याकडे केली आहे.
