Advertisement
चिंचवड : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये बंडखोराने निशाण फडकावले असून राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अर्ज जर मागे घेतला नाहीतर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिला आहे.
चिंचवडमध्ये आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. बंडखोरी होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
आम्ही किमान एक जागा लढविण्याची इच्छा होती. पण भाजपला रोखण्यासाठी आम्ही मविआने अधिकृत उमेदवार दिले आहे. राहुल कलाटेंची समजूत घालण्याचा प्रयत्न करू. नाही ऐकले तर मग पक्ष स्तरावर निर्णय घेवू. वेळ आली तर उद्धव ठाकरेही राहुल कलाटेंशी बोलतील, असं शेवाळे म्हणाले.
