Advertisement
चिंचवड : काँग्रेसमध्ये एकीकडे वाद चव्हाट्यावर आले आहे तर दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीमध्येही राडा झाला आहे. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवाराची नाराजी उफाळून आली आहे. राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. राहुल कलाटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारासाठी काम करतील अशी नेत्यांची अपेक्षा होती. पण नेत्यांचा मनधरणीचा प्रयत्न फसला. राहुल कलाटे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अपक्ष अर्ज भरून निवडणूक लढवणार असल्याचे राहुल कलाटेंनी जाहीर केलं. त्यामुळे राष्ट्रवादी पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
