#

Advertisement

Monday, February 27, 2023, February 27, 2023 WIB
Last Updated 2023-02-27T11:31:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

गरज असेल तर त्यांनी युतीसाठी आमच्याकडे यावे : छत्रपती संभाजीराजे

Advertisement

धाराशिव : 'स्वराज्य संघटना ही एक ब्रँड असून आम्ही पुढील निवडणुकामध्ये युती करावी यासाठी शिंदे-फडणवीस किंवा ठाकरे यांच्याकडे जाणार नाही, त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, असं म्हणत स्वराज संघटनेचं संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी ऑफरच दिली. 
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये आज स्वराज्य संघटनेच्या 58 शाखेचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. स्वराज्य एक ब्रँड असून शिंदे फडणवीस किंवा ठाकरे यांना गरज असेल तर त्यांनी युतीसाठी आमच्याकडे यावे आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. समविचारी पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.