Advertisement
कुडाळ : "धनुष्यबाण हे रामाच्या हातात शोभून दिसते, रावणाच्या नाही. तुम्ही धनुष्यबाण घेऊन आलात, तर आम्ही तुम्हाला मशालीने पळवून लावू. ती दाढीपण जाळून टाकू," असं विधान ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. कुडाळ येथे आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून निर्णयाला आव्हान दिलं आहे. दुसरीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी एक मोठं विधान केलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सुभाष देसाई यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे वाघ आहेत असं ते यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षचिन्ह गेलं असले तरी, राज्यातील जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. ते वाघच आहेत असं अरविंद केजरीवालांनी सांगितलं. तसंच सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
