#

Advertisement

Monday, February 27, 2023, February 27, 2023 WIB
Last Updated 2023-02-27T11:41:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आजारी बाळाला घेऊन आलेल्या आमदार सरोज अहिर यांच्या डोळ्यात पाणी

Advertisement

मुंबई : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या बाळासह हजर राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिर यांचं नाव चर्चेत आलं होतं. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. पण, मुंबईत अधिवेशनासाठी आलेल्या सरोज अहिर यांच्या डोळ्यात पाणी आले. आपल्याला बाळासह राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था न करण्यात आल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
आपल्या अडीच महिन्याच्या लेकीसह राष्ट्रवादीच्या आमदार नागपूर अधिवेशनात हजेरी लावली होती. आमदार अहिर आपल्या बाळाला घेऊन अधिवेशनाला आल्यामुळे सर्वच आमदारांनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यावेळी हिरकणी कक्ष स्थापन केला जाईल, असं आश्वासनच मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं होतं. पण, आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अहिर आपल्या लेकीसह आल्या.
मी जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी इथं आले होते. 8 दिवसांआधीच प्रधान सचिवांना भेटले. आज मी इथं आले होते, परंतु, हिरकणी कक्षाची फक्त पाटी आहे. मला महिना भर सभागृहात हजर राहणार असेल तर कक्षामध्ये जागा द्यावी अशी विनंती केली. मी एकही दिवस सभागृह बुडवलं नाही. मी आहे त्या परिस्थितीत काम केलं. गरोदर असताना सुद्धा आली होती. एक आई म्हणून माझं बाळ सुरक्षित राहावं अशी अपेक्षा होती. पण हॉलमध्ये धूळ होती, अशा वातावरणात आजारी बाळाला ठेवू शकत नाही, असं म्हणत अहिर आपल्या बाळाला विधिमंडळातून घेऊन गेल्या.