Advertisement
सोलापूर : मुंबई-सोलापूर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसनंहा प्रवास कमी वेळात पूर्ण होईल. ही एक्स्प्रेस सुरू होण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असतानाच या मार्गावरील रेल्वे ट्रॅकचं अपग्रेडेशन अद्याप पूर्ण झालेलं नाही. हे काम सुरू असल्यानं 'वंदे भारत' च्या गतीला ब्रेक लागणार आहे.
वंदे भारत' एक्स्प्रेसचा वेग प्रतितास 180 किलोमीटर आहे. पण, ती मुंबई-सोलापूर दरम्यान 110 किलोमीटरच धावणार आहे. ट्रॅक’अपग्रेडेशनचे काम होणार नाही, तोपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची गती वाढणार नाही अशीही चर्चा सुरू आहे.
कर्जत ते लोणावळा सेक्शनमध्ये घाट आणि ट्रॅक चढावर असल्याने याठिकाणी देखील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे काम रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ट्रॅक अपग्रेडेशन केल्यावर ताशी 110 हून वाढून 130 किलोमीटर होईल. हे काम करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.
