Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बुधवारपासून ईडीने ठाण मांडलं आहे. आता या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. केडीसीसी बँकेसह ईडीने हसन मुश्रीफ य़ांच्या संताजी घोरपडे साखर कारख्यान्यावरही कारवाई केली. गेल्या ३० तासांपासून ईडीकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरू होती.
ईडीने पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेताना बँकेतून चार बॉक्स भरून कागदपत्रेही नेली आहेत. ईडीने पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर बँकेचे इतर कर्मचारी संतप्त झाले आहेत. तर बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.
