#

Advertisement

Saturday, February 25, 2023, February 25, 2023 WIB
Last Updated 2023-02-25T12:12:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राज्यात मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता

Advertisement

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाच्या सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर राज्यात पुन्हा सत्ताबदल किंवा मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवले तर राज्याच्या राजकारणाला नवे वळण येण्याची शक्यता आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवी राजकीय समिकरणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनीही पलटवार केला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे विरोधकांवर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक खळबळजक वक्तव्य केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. पुण्यातील कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. पण माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल किंवा लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ते आमदार जर अपात्र ठरले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.