Advertisement
पुणे : महाराष्ट्राच्या
शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गोला तो म्हणजे इचलकरंजी येथील ए.जे.सोशल
वेल्फेअर फाउंडेशनचे सोशल मीडिया प्रमुख अमन फयाज पटेल यांची तुर्की येथे होणाऱ्या
international youth conference साठी निवड झाली आहे. या कॉन्फरन्समध्ये 50
देशांमधून 250 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अमन पटेल यांनी यांच्या
पुढील वाटचालीसाठी व कॉन्फरन्स साठी भोसरी येथील राणी पुतळाबाई लॉ कॉलेजच्या
संचालिका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मदतीच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतातून फक्त या कॉन्फरन्ससाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये
अमन पटेल यांचा समावेश आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, या आधी सुद्धा
वेगवेगळ्या ठिकाणी पटेल यांची निवड झाली आहे, त्यामध्ये खेल मंत्रालय मार्फत
घेण्यात आलेल्या युवा संसदेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व त्यांनी केले
आहे. MIT स्कूल ऑफ गव्हरमेंट मार्फत घेण्यात आलेल्या 11व्या व 12 व्या Indian
student parliament मध्ये सुद्धा पटेल यांनी सहभाग नोंदविला. अमन पटेल हे नॅशनल
सोशल युथ आयकॉन गोल्डन अवार्डचे मानकरी आहेत.
