Advertisement
पुणे : महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात चर्चेत असलेल्या डान्सर गौतमी पाटीलचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमी पाटील एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत होती. त्यावेळी चोरून तिचा व्हिडीओ काढण्यात आला. यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गौतमीच्या समर्थनात प्रतिक्रिया देत याविषयी रोष व्यक्त केला आहे. दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना व्हिडीओ शूट करुन काहींनी तो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या सर्व प्रकारानंतर पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
