#

Advertisement

Monday, February 27, 2023, February 27, 2023 WIB
Last Updated 2023-02-27T12:00:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल

Advertisement

पुणे : कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रात भाजपचं उपरणं घालून मतदान केल्याने रासनेंवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी निवडणूक अधिका-यांकडे केली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.आचारसंहिता असताना धंगेकरांनी उपोषण केलं होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.