#

Advertisement

Thursday, February 9, 2023, February 09, 2023 WIB
Last Updated 2023-02-09T11:17:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीच्या प्रचारात ठाकरेंची शिवसेना गायब

Advertisement

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला जड जाणार असल्याचे दिसत आहे. आधी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गटातील इतर शिवसैनिकही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार यंत्रणेतून गायब आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवणुकीत पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधाण आलंय.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीकडून ज्या प्रचार सभा, प्रचार रॅली, मेळावे  आणि एवढंच काय तर ज्या जेवणावळ्या घातल्या गेल्या त्यातही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी दिसत नाहीत. राष्ट्रवादीने शिवसेनेला डावललं की शिवसेनेने प्रचार थांबवला असा प्रश्न विचारला असता जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी, अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारखेच्या आत कुणी माघार घेइल का? याची वाट बघत होतो? असं मार्मिक उत्तर देत राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. उद्यापासून आपण प्रचारात सहभागी होणार असल्याचं सांगत सारवासारवही केली आहे. 

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही
पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही आणि त्यामुळे आमदारकीचा आश्वासक चेहरा म्हणून आपल्याकडे बघणारे अनेक शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी देखील आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.