#

Advertisement

Thursday, February 9, 2023, February 09, 2023 WIB
Last Updated 2023-02-09T11:23:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले..

Advertisement

मुंबई : माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतो आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी टीका केली. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी आहे. सामान्य जनता व्यापारी वर्ग महिला एका भीतीच्या वातावरणाखाली आहेत. आदित्य ठाकरेंसोबत जो प्रसंग घडलेला आहे, पोलीस कितीही सारवासारव करू दे पण हल्ला झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला असे अनेक प्रकार रोज घडत आहेत, अशी टीका राऊतांनी केली.