Advertisement
तुळजापूर : मंगरूळ येथील श्री कंचेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवानिमित्त आयोजीत सांस्कृतिक सोहळ्यात मंगरूळ गावातील पाच शाळांनी सहभाग घेतला. या शाळांतील पथकाने लोकगीत, कोळीगीत आदी एकूण 25 गाणी सादर केली. यामध्ये संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, या शाळेस ट्रॉफी, प्रमाणपत्र व 5000 रुपये रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब सचिव सिद्राम जावीर, विश्वस्त कोमलताई साळुंखे. ईश्वर क्षीरसागर, मुख्याध्यापक तुकाराम कोरे यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या यशस्वी पथकास शुभेच्छा दिल्या.
