#

Advertisement

Thursday, February 23, 2023, February 23, 2023 WIB
Last Updated 2023-02-23T12:20:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्रिपद पोस्टरबाजी : सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीच्या आधी जयंत पाटील मग अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे. या नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी सुरू आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईत हे पोस्टर लावण्यात आले. मुख्य म्हणजे जयंत पाटील यांच्या पोस्टरवर कार्यकर्त्यांचे फोटो होते, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणाऱ्या पोस्टर्सवर कार्यकर्त्यांची नावही नव्हती. उत्साही कार्यकर्त्यांनी असे पोस्टर लावले असतील, पण जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं अजित पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पोस्टरवरून संताप व्यक्त केला. जर असं पोस्टर कोणी लावलं असेत आणि त्याच्यावर कोणी लावलं त्याचं नाव नसेल तर, मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी न्याय मिळून द्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.