#

Advertisement

Thursday, February 23, 2023, February 23, 2023 WIB
Last Updated 2023-02-23T12:15:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! MPSC चा मोठा निर्णय

Advertisement

पुणे : मुंबई MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या मुख्य परीक्षांसाठी वर्णात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत आता राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.  राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे.