Advertisement
मुंबई : राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिल निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडले, त्यामुळे अजित पवार संतापले.
राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले.
