#

Advertisement

Friday, March 31, 2023, March 31, 2023 WIB
Last Updated 2023-03-31T10:58:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

विहिरीसाठी मागितली 10 हजारांची लाच, सरपंचाने अधिकाऱ्याच्या दारात उधळले 2 लाख रुपये

Advertisement

छत्रपती संभाजीनगर : सरकारी काम आणि चार महिने थांब याचा प्रत्यय प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पाहण्यास मिळतो. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहण्यास मिळाला. विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत एका सरपंचाने 2 लाख रुपये समितीच्या कार्यालयासमोर उधळले.
गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत, गावाच्या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठले आणि पैशांची उधळण केली. मंगेश साबळे असं या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत.  गावात विहिरी मंजूर करत नाही यासाठी लाच मागितली म्हणून या सरपंचाने शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले आणि पंचायत समिती कार्यालयात पैसे उधळले.
यावेळी या सरपंचाने राज्य शासनावर टीका करत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी या ठिकाणी अधिकारी पैसे मागत आहेत. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे, असे म्हणत फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर या सरपंचाने गळ्यातील बंडलातील नोटांची उधळणही केली.