#

Advertisement

Friday, March 31, 2023, March 31, 2023 WIB
Last Updated 2023-03-31T11:23:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राज्य सरकारकडून रेडीरेकनेर संदर्भात मोठी घोषणा

Advertisement


मुंबई : राज्य सरकारने रेडीरेकनेर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढणार नाहीत. मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच 2022-23 मधील रेडीरेकनर दर 2023-24 च्या आर्थिक वर्षात कायम राहणार आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याचे उप-सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रकांना पाठवलं आहे.
महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे बास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम 1995 मधील नियम 4 च्या उपनियम (9) च्या तरतूदीनुसार शासनाने रेडीरेकनर दरांबद्दलचे निर्देश दिल्याचं राज्याच्या उप-सचिवांनी या पत्रात म्हटलं आहे.. "वर्ष 2022-23 चे वार्षिक दर विवरणपत्रात कोणताही बदल न करता वर्ष 2023-24 मध्ये चालू ठेवण्यात यावे," असे निर्देश देण्याचा शासनाचा आदेश असल्याचं बजाज यांनी नमूद केलं आहे. तसेच विकासक व इतर सामान्य नागिरकांना त्यांच्या मिळकतीच्या दरांबाबत वार्षिक बाजार मुल्य दर तक्त्यामध्ये वाढ किंवा घट करुन देण्याची विनंती अर्ज नियमानुसार निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पाठवलं जात आहे, असंही उपसचिवांनी म्हटलं आहे.
मुंबईबरोबर महामुंबईमध्ये म्हणजेच ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये 3.5 लाखांहून अधिक घरं पडून आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत घरांची विक्री रोडावली आहे. घरांच्या किंमती दिवसोंदिवस वाढत असल्याने दुसरीकडे तयार घरांना अधिक दर असल्याने ग्राहकच मिळत नाहीत. महामुंबईमध्ये साडेतीन लाखांहून अधिक घरं विक्रीशिवाय पडून आहेत. खास करुन मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, पनवेल, भाईंदर, वसई-विरार तसेच पालघरचा समावेश आहे.