Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. दरम्यान आता ठाकरेंचे दोन खासदारही त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी रायझिंग इंडिया या नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला आहे.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगलं सरकार आहे. ठाकरेंनी त्याच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताचं सरकार मार्गी लावत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नाहीत, काही मोजके खासदार सोडले तर त्यांचे सर्व खासदार आमच्यासोबत. आणखी दोन आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही मला मिळाली आहे. विधिमंडळात तर हम दो हमारे दोन असेच राहतील. फक्त आडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही. मेरिटनुसारच देश प्रगती करेल, असं ते म्हणाले.
