#

Advertisement

Thursday, March 30, 2023, March 30, 2023 WIB
Last Updated 2023-03-30T09:33:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री शिंदेंचा अयोध्या दौरा ठरला, रामजन्मभूमीत स्विकारणार शिवधनुष्य!

Advertisement

मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. 9 एप्रिलला अयोध्येचा दौरा ठरला आहे. या दौऱ्यादरम्यानच साधू, संत आणि महंतांकडून मुख्यमंत्री शिंदे हे शिवधनुष्य स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. अखेरीस आज रामनवमीच्या दिवशी अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांचे सहकारी मंत्री, शिवसेना आमदार आणि खासदारांचा अयोध्या दौरा आता 9 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहे. साधू, संत आणि महंतांकडून “शिवधनुष्य” स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी राम लल्लाचे दर्शन आणि रात्री शरयू नदी महाआरती होणार आहे.