Advertisement
सोलापूर : पुण्याचे खासदार भाजपचे ज्येष्ठ
नेते, माजी मंत्री गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. विधानसभेतील
कामकाजावेळी एक सच्चा मित्र म्हणून अनेक वेळा बापट यांच्याशी संपर्क आला. पक्षनिष्ठ
म्हणून त्यांच्याशी चांगला संपर्क होता. पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे,
सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
आमच्यातून गेले आहे, गिरीश बापट यांचे निधन हे आम्हा राजकीय, सामाजिक
कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकीय
चेहरा म्हणून गिरीश बापट यांच्याकडे पाहीले जात होते. गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ,
प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केले.
राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचे काम लक्षात राहणारे
आहे. एक सहकारी, सुहृदय मित्र गमावला असल्याची भावना आहे. एक मित्र म्हणून
गिरीशभाऊंची उणीव सतत जाणवत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, अशा
शब्दात सोलापूर भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी गिरीश बापट यांच्या
निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.
