Advertisement
IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचं वेगळच कारण समोर
मुंबई : (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) मधील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने ऑन-कॅम्पस हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. कॅम्पसमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता. यामुळेच दर्शन सोळंकी याने आत्महत्या केल्याचाही आरोप होता. या घटनेचा तपास करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने त्यांचा रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन सोळंकी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबाद येथील असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता विद्यार्थी सातव्या मजल्यावरून पडला होता. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही.
काय आहे अहवालात?
अंतिम अहवालात म्हटले आहे की, “विविध विषयांच्या परीक्षेत दर्शन सोळंकीची कामगिरी खराब होत होती. विशेषतः सेमिस्टरच्या दुसऱ्या सहामाहीत. खराब शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर वाईट परिणाम झाल्याची शक्यता आहे. दर्शन अनेकदा मित्रांशी चर्चा करताना बोलत असे की आयआयटी बॉम्बे मधून बी.टेकचा अभ्यास सोडून आपल्या गावी कुठेतरी प्रवेश घेईल. अहवालात असे म्हटले आहे की दर्शन सोळंकीच्या बहिणीने कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाबद्दल बोलले होते. मात्र, तिच्या विधानाव्यतिरिक्त, दर्शनाला जातीय भेदभावाला सामोरे जावे लागल्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा आढळला नाही. दर्शनचे वडील रमेशभाई यांना अहवालाची प्रत मिळाली आहे. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली आहे.
