#

Advertisement

Friday, March 31, 2023, March 31, 2023 WIB
Last Updated 2023-03-31T10:38:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता 60 व्या वर्षी रिटायरमेंट

Advertisement

पंजाब:  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक गुडन्यूज आहे. याचं कारण म्हणजे 58 व्या वर्षी जी रिटायरमेंट घ्यावी लागते ती आता तुम्हाला 60 व्या वर्षी घेता येणार आहे. UT प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये लागू होणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्र कर्मचार्‍यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे 4000 रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल, सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता 12 पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्ता मिळेल. शहरातील 20,000 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या अधिसूचनेमुळे यूटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी आणि सेवा शर्तींमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता 58 व्या वर्षी नाही तर 60 व्या वर्षी रिटायरमेंट घेता येणार आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! 18 महिन्यांची थकबाकी DA मिळणार नाही.हे नियम केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या कामकाजात काम करणाऱ्या अखिल भारतीय सेवांचे सदस्य, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कर्मचारी, यूटी चंदीगडमध्ये पूर्णवेळ नोकरीत नसलेल्या व्यक्तींना, आकस्मिक परिस्थितीतून पैसे भरलेल्या व्यक्तींना लागू होणार नाहीत. पंजाबमध्ये AAP सरकार आल्यानंतर 14 दिवसांनंतर चंदीगड सेंट्रल सर्व्हिस रूल लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. पंजाबमधील नेत्यांनी याचा विरोध केला होता.