Advertisement
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतंच निधन झालं आहे. बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसेच आमची त्यांना विनंती असेल की त्यांनी उमेदवार देऊ नये, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता, त्यावर सध्या बोलणं योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
