#

Advertisement

Wednesday, March 1, 2023, March 01, 2023 WIB
Last Updated 2023-03-01T12:46:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

कसबा, चिंचवड पोटनिवडणुक : निकाल काय लागणार?

Advertisement

पुणे : राज्यात शिंदे - फडवणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दुसरी पोटनिवडणूक होत आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात आम्हीच बाजी मारु असता दावा करण्यात आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या गुरुवारी 2 मार्चला निकाल लागणार आहे. 
भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिपणाला लावली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य पणाला लागले आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

भाजपची प्रतिष्ठापणाला

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात काहीही करुन जागा राखण्यासाठी भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर विधानपरिषद निवडणुकीपाठोपाठ भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीनेही ही निवडणूक सर्वशक्तिनिशी लढली. तुलनेत मोठ्या असलेल्या  चिंचवड मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाले आहे. इथे मतमोजणीच्या 37 फेऱ्या होतील, त्यामुळे अधिकृत अंतिम निकाल हाती येण्यास रात्रीचे 10 वाजण्याची शक्यता आहे. तर कसबा हा तुलनेने लहान मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे निकाल लवकर लागेल. पुण्यात कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. 

काय आहे एक्झिट पोल? 

पुण्यातील कसबा पेठमध्ये यावेळी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आलाय. 70 हजारांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी होऊ शकतात. तर त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 60 हजार दरम्यान मते पडू शकतात.