#

Advertisement

Wednesday, March 8, 2023, March 08, 2023 WIB
Last Updated 2023-03-08T16:01:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार ?

Advertisement

मुंबई : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस  पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. कारण ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तशा प्रकारचे संवाद पहायला मिळाले आहेत. आज भी अच्छे रिलेशन है... हमारे मन में कटुता नही... मेरा दिल साफ है...  उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वक्तव्यामुळे यांच्यातील वाद संपणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंनी देखील यावर भाष्य केले आहे. 

देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. तर, फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरज असल्याचे मत फडणवीसांनी व्यक्त केले.  फडणवीस यांच्याशी शत्रुत्व नाही वैयक्तीक मतभेद आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी दोस्तीचा हात पुढं केल्यानंतर फडणवीसही मागे राहिले नाहीत. उद्धव आणि आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं फडणवीसांनी स्पष्ट करून टाकले. ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. 'जानी दुश्मन' पुन्हा जिगरी दोस्त बनणार? अशी चर्चा रंगली आहे.