#

Advertisement

Saturday, March 11, 2023, March 11, 2023 WIB
Last Updated 2023-03-11T12:14:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ED ची कोठडी

Advertisement

मुंबई : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून  ताब्यात घेतले आहे.  व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. काल (शुक्रवारी 10 मार्च) सलग चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. मात्र, ईडीने 14 दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे. ईडीचे वकील सुनील गोंसालवीस यांनी आरोपी रिमांड कॉपीवर, सदानंद कदम यांची स्वाक्षरी घेण्याची कोर्टाला परवानगी मागितली. कदम यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी मान्यता दिली. 11 मे 2022 ला दाखल तक्रारीवर ED ने ECR दाखल केला.