Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार हे आपल्या भाषणामुळे कायम चर्चेत असतात. अलीकडेच त्यांचा डोळा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण, आपण डोळा का मारला आणि त्या मागे उद्देश काय होता, याचा खुलासा अजित पवार यांनी केली आहे. एका पत्रकाराला प्रश्नाचे उत्तर नंतर देतो, हे सांगण्यासाठी डोळा मारला होता, असं अजित पवार यांनी स्पष्ट केल.
माझं त्या दिवशी पोडियमवर बोलणं झालं होतं. त्यावेळी पाठीमागून कुणी तरी सांगितलं, उद्धव ठाकरे आले आहेत. त्यामुळे मी बाजूला झालो. त्यावेळी मी एक डोळा मारला आहे. त्याच्यात काय झालं. एक पत्रकार मित्र होता, तो माला एकच प्रश्न आहे, तो विचारू द्या, असं म्हणत होता, मी त्याला म्हटलं थांब रे, साहेबांचं होऊ दे मग मी बोलतो. असं ते झालं होतं. बोलताना थांब म्हणण्याऐवजी, डोळा मारला. आता त्या व्हिडीओचा एवढा गाजावाजा केला की, अजितदादांनी डोळा का मारला, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली. त्याला अर्थच नाही, असा खुलासा अजित पवारांनी केला.
उद्धव ठाकरेंबद्दल आदर
आपली काही परंपरा आहे, आम्ही अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे प्रमुख होते. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी काम केलं आहे. राज्याला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे मी त्या दिवशी त्यांना बोलण्यासाठी बाजूला झालो.
