Advertisement
बीड : राज्यभरात दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीसह धक्कादायक प्रकार घडला आहे. दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली आहे. दहावीचा पेपर असतानाही ही मुलगी विवाह मंडपात दिसली. पेपरला जाऊ न देता जबदरस्तीनं तिला लग्नमंडपात आणण्यात आले. चाईल्ड लाईन बीडच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण समोर आणलं. आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
दहावीचा पेपर असताना देखील ही मुलगी परीक्षा केंद्राऐवजी विवाह मंडपात दिसली. या मुलीला पेपरला जाऊ न देता तिचा विवाह लावण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत विवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विवाह थांबवला नाही.
बालविवाहाच्या या प्रकरणांमध्ये परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील शासकीय यंत्रणांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येत आहे.
