Advertisement
नवी दिल्ली : 'राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत येण्याचे निर्देश घटनापीठ देऊ शकत नाही. गरज असेल तेव्हा राज्यपाल बहुमत चाचणीचा निर्देश देऊ शकतात. सुप्रीम कोर्टात येऊन या सर्व प्रक्रिया रद्द करता येऊ शकत नाही' असा युक्तिवाद करत हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही सर्वात मोठी चूक असल्याचे कोर्टात निदर्शनास आणून दिले.
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आज ते युक्तिवाद करणार आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आज जोरदार युक्तिवाद केला आहे. तसंच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत.
