#

Advertisement

Thursday, March 2, 2023, March 02, 2023 WIB
Last Updated 2023-03-02T17:57:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये सात जागा जिंकल्या

Advertisement

नागालँड : महाराष्ट्रात एकीकडे कसबा  आणि चिंचवड  विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा सुरु आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांचा विजय झाला असून धांगेकर यांच्या विजयानंतर काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसही जल्लोष करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडे आनंदोत्सव साजरा कऱण्याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे नागालँडमध्ये पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा जिंकल्या असून प्रमुख विरोधीपक्ष ठरला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये सात जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याचं स्पष्ट आहे. नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा असून भाजपा आणि एनडीपीपी युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट आहे. भाजपा आणि एनडीपीपीला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये एनडीपीपीला २५ तर भाजपाला १२ जागांवर यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान ५ जागांवर पक्षाला दुस-या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. 

आठवले गटाचे दोन उमेदवार विजयी 
केंद्रात मंत्रीपद असून महाराष्ट्रात विधानसभेची एकही जागा न जिंकलेल्या आरपीआय आठवले गटानही नागालँडमध्ये २ जागा जिंकल्या आहेत. तसंच 4 जागांवर दोन नंबरची मतं मिळवली आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मुंबईत हा विजय साजरा केला.