#

Advertisement

Friday, March 3, 2023, March 03, 2023 WIB
Last Updated 2023-03-03T11:27:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

धैर्यशील मानेंनी 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी : संजय राऊत यांची टीका

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून आहेत.  दरम्यान] त्यांनी मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहरात सभा घेतल्या\ यामध्ये त्यांनी ठाकरे गटातून फुटलेल्या दोन खासदार आणि आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. राऊत यांनी धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दार खासदार म्हणत त्यांनी इचलकरंजी येथे माने यांना थेट आव्हान दिले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, धैर्यशील मानेंनी 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी, "यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले? यांना कोठेच धैर्य नसतो. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे असे खात्रीलायकरित्या समजले आहे.
जनभावना बघता त्यांना बाहेरही फिरता येणार नाही, अशा गद्दारांना तुम्हीच योग्य तो धडा शिकवा. इचलकरंजीमधील घोरपडे नाट्यगृहात शिवगर्जना मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
राऊत म्हणाले की, मूळ शिवसेना ही जनमाणसांची आहे. बाहेर गेलेले 40 गद्दार महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, त्यांच्या पुढील पिढ्यांनाही गद्दार म्हणून कायम कपाळावर कलंक राहणार आहे. जनताच त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल. आता तुम्हीच त्यांना त्यांची जागा दाखवून द्या.