Advertisement
मुंबई : खासदार नवनीत राणांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे. 'मातोश्री' बाहेर नवनीत राणा हिंदू शेरणी अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. 'जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं वो किसी काम का नहीं ' अशा अशयाचा मजकूर बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसेवरून वातावरण तापलं होतं. नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय का असा सवाल उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केला होता. यावरून नवनीत राणा आणि खासदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राना दाम्पत्य चौदा दिवस तरुंगात होते. आता पुन्हा एकदा उद्ध ठाकरे यांना डिवचण्यात आलं आहे.
