#

Advertisement

Monday, March 13, 2023, March 13, 2023 WIB
Last Updated 2023-03-13T10:37:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

गड किल्ल्यांवर मद्यापान केल्यास थेट तुरुंगात रवानगी

Advertisement

मुंबई : गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना कडक कारवाई करण्याचा मोठा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. गड किल्ल्यांवर मद्यापान करताना आढळल्यास थेट तुरुंगात रवानगी होणार आहे.
गड किल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली.  गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना निदर्शनास आणुन देणाऱ्यांना यातील 50 टक्के रक्कम बक्षिम म्हणून दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव  विधी व न्याय विभागाला मंजूरीसाठी पाठवला जाणार आहे. गड किल्ल्यांवर हेरिटेज मार्शल नेमणार असल्याची माहिती देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 
राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करणारे आता कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत. यापूर्वी 2020 मध्ये सरकारने असा प्रकारचा निर्णय जाहीर केला होता. गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. किल्ल्यांवर मद्यमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले होते.