#

Advertisement

Monday, March 13, 2023, March 13, 2023 WIB
Last Updated 2023-03-13T10:30:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नगरसेवकाच्या हत्येने यवळतमाळमध्ये खळबळ

Advertisement


यवतमाळ : बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पैशाच्या वादातून ही निर्घृण हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. धारदार शस्त्राने वार केल्याने या नगसेवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर यवळतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अनिकेत गावंडे यांनी रेती व्यवसायात जम बसवला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करुन प्रहार पक्षाकडून नगरपंचायत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अनिकेत गावंडे नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. रेती व्यवसायातील पैशातून त्यांचा रविवारी रात्री काही जणांसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी गावंडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. जखमी अनिकेत यांना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या खून प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.