Advertisement
ठाणे : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सकाळी व्यायामासाठी फिरताना 4 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. दरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना दुसरी एक घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हानगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचा योगीराज देशमुख पाठपुरावा करत होते.
मनसे नेते संदीप देशपांडेंवर ही हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. पण, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी करा अशी मागणी मनसेचे नेते अमय खोपकर यांनी केली आहे.
