#

Advertisement

Thursday, March 30, 2023, March 30, 2023 WIB
Last Updated 2023-03-30T09:50:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Advertisement

मुंबई : रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या भेटीला आली. विविध कलाकारांनी अतिशय समर्पकपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवल्या. यामध्ये अरुण गोविल यांनी साकारलेले श्रीराम म्हणजे जणू देवाचं रुपच, अशीच प्रतीमा चाहत्यांमध्ये तयार झाली. पण, सध्या मात्र याच श्रीरामांचं एक वेगळं रुप सिनेरसिकांना पाहायला मिळत आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीवर असणारा अभिनेता प्रभास आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन यामध्ये माता सीतेच्या रुपात दिसेल. राम नवमी च्या निमित्तानं या चित्रपटाचं एक नवं पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीला आणलं गेलं. 'मंत्रों से बढ़के तेरा नाम.... जय श्री राम' असं कॅप्शन लिहित प्रभासनं हे पोस्टर शेअर केलं.
क्षणातच पोस्टरची चर्चा सुरु...
चित्रपटाच्या पोस्टरवर रामाच्या रुपात प्रभास, सीतेच्या रुपात क्रिती सेनन, लक्ष्मणाच्या रुपात सनी सिंग आणि रामभक्त हनुमानाच्या रुपात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकत आहे. आपण पुराणकथांमध्ये राम- लक्ष्मण- सीता आणि मारुतीरायाची जी वर्णनं पाहिली, ऐकली त्याच्या बरंच जवळ जाणारं हे पोस्टर. पण, काही सिनेरसिकांना मात्र ते भावलं नाही आणि त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.