Advertisement
पुणे : भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होतं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपने पुण्यात मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
गिरीश बापट आणि पुणे हे भाजपसाठी समीकरण बनलं होतं. गिरीश बापट यांनी जवळपास 30वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे. गिरीश बापट हे १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. १९९६ मध्ये त्यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली होती. मात्र बापट यांचा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पराभूत केलं होतं.
