Advertisement
पुणे : कसबा पेठच्या बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. पोटनिवडणुकीतल्या या भूकंपाच्या धक्क्याचे पडसाद आता भाजपमध्ये उमटायला सुरूवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर मुक्ता टिळक यांचे पूत्र आणि भाजपचे पदाधिकारी कुणाल टिळक यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
टिळक कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कुणाल आणि शैलेश टिळकांना उमेदवारी नाकारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानं वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पूत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलंय. गेल्या 50 वर्षांत टिळक कुटुंबानं पुण्यात जे काम केलं ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार, असा सवालही त्यांनी केलाय. येत्या निवडणुकीत होणारे बदल दिसतील, असं सूचक वक्तव्यही कुणाल टिळक यांनी केल आहे.
