Advertisement
मुंबई : 'विधीमंडळ नव्हे चोर मंडळ' असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीमध्ये आले आहेत. विधीमंडळाकडून संजय राऊत यांना या वक्तव्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र अद्यापही संजय राऊत यांनी या नोटीसीला उत्तर दिलेलं नाही. आता संजय राऊत यांनी विधीमंडळाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये हक्कभंग नोटीसीवर स्पष्टीकरण देण्यासाठी अधिकच्या वेळीची मागणी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विधीमंडळ कार्यालयाकडून राऊतांच्या पत्रावर विचारविनिमय सुरू आहे. थोड्याचवेळात विधीमंडळ कार्यालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे राऊतांना मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा सुनावली जाणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
